बीडचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत सर यांनी एका मातेचा ८ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा शोधून काढला…

नवनीत सरांनी दिली रक्षाबंधनाची सर्वात अनमोल भेट! ८ वर्षांनी आईच्या कुशीत परत आलं हरवलेलं लेकरू… बीडचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत सर यांनी एका मातेचा ८ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा शोधून काढला… आणि त्याला तिच्या कुशीत परत देत, रक्षाबंधनाच्या दिवशी दिली एक अशी भेट – जी आईच्या हृदयात आजन्म कोरली जाईल. 👩‍👦 आईच्या डोळ्यातून वाहत होते आनंदाश्रू, हात थरथरत होते, आणि ओठांवर एकच शब्द – "माझं बाळ परत आलं…!" सगळीकडे फक्त एकच भावना – मायेचं नातं कधीच हरवत नाही… या पुनर्मिलनाचा क्षण इतका भावनिक होता की, उपस्थित प्रत्येकाचं हृदय भरून आलं. 🌸 हीच तर खरी रक्षाबंधनाची भावना – नात्यांची गुंफण, प्रेमाचं बंधन. 🙏 बीड पोलीस – तुमच्यासाठी, तुमच्यासोबत. हरवलेल्यांना शोधणं हे आमचं कर्तव्यच नव्हे, तर आमचं व्रत आहे.