मोबाईल हरवला? काळजी करू नका – CEIR पोर्टलवरून लगेच ब्लॉक करा! 👮♂️ बीड पोलिसांचे नागरिकांना आवाहन ⚠️ "मोबाईल चोरी होतो , गडबडीत हरवतो... पण योग्य प्रक्रिया माहिती आहे का?" भारत सरकारचा CEIR पोर्टल तुमचं हरवलेलं किंवा चोरीचं मोबाईल शोधण्यात आणि ब्लॉक करण्यात मदत करतं! 🔍 CEIR म्हणजे काय? Central Equipment Identity Register ही केंद्र सरकारची सेवा आहे जी हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल फोन ब्लॉक करण्यासाठी वापरली जाते. फोनचा गैरवापर रोखण्यासाठी CEIR एक प्रभावी उपाय आहे. 🎯 मोबाईल हरवल्यास CEIR पोर्टलवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक 6 टप्पे: 1️⃣ सर्वप्रथम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा ➤ मोबाईल चोरीची अधिकृत तक्रार आवश्यक आहे 2️⃣ सिम कार्ड ब्लॉक करा आणि नवीन सिम सुरू करा ➤ OTP द्वारे CEIR साईटवर नोंदणी करताना आवश्यक 3️⃣ खालील सॉफ्टकॉपी (500KB पेक्षा कमी) CEIR साईटवर अपलोड करा: 🔹 पोलिस स्टेशनची तक्रार कॉपी 🔹 मोबाईल खरेदीचे बिल(IMEI साठी) 🔹 तुमचे ओळखपत्र (आधार, पॅन, लायसन्स, इ.) 4️⃣ वेबसाइटला भेट द्या: 🌐 https://www.ceir.gov.in/Home/index.jsp 5️⃣ Block Stolen/Lost Mobile या पर्यायावर क्लिक करा ➡️ सर्व माहिती भरा ➡️ Submit करा 6️⃣ Request ID सुरक्षित ठेवा ➤ स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून ठेवा – भविष्यात वापरासाठी उपयुक्त 🚓 बीड पोलिसांकडून नागरिकांना सूचना: "मोबाईल हरवला म्हणजे सगळी माहितीही हरवते – CEIR वापरून सुरक्षित राहा!"